औरंगाबाद मध्ये एमआयएम-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

blank

औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरळीत झालेल्या निवडणुकीला औरंगाबादेत गालबोट लागलेच.कटकट गेट येथे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना हे एकमेकांसमोर आल्यामूळे दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणमारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

एमआयएमतर्फे पुर्व,पश्चिम आणि मध्य मतदारसंघातून उमेदवार देण्यात आला आहे. याच मध्य मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कदरी मौलाना उभे आहेत. कटकट गेट येथील मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी गेलेल्या खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार कदरी मौलाना हे समोरा समोर आल्यामूळे त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी एकमेकां विरोधात घोषणाबाजी केली.

यामूळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घोषणाबाजीचे रुपांतर काही वेळात हाणामारी झाले. यामूळे एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसामेर भिडले. यात कार्यकर्त्यांनी एकमेकांना हाणामारी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामूळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या