भाजपचे संकट मोचक संकटात,अमळनेरमध्ये गिरीश महाजन यांना मारहाण

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार अमळनेर मध्ये घडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना-भाजप संयुक्त मेळाव्यात हा प्रकार घडला आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार ड़ॉ. बी.एस. पाटील यांच्यातही जोरदार हाणामारी झाली आहे.

जळगाव लोकसभेचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ आज अमळनेर येथे भाजप – सेना कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पुढे सर्व प्रकार हाताबाहेर जात एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली आहे.यावेळी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाजन यांना देखील मारहाण करण्यात आली आहे.