जळगावातील हाणामारी : विचारांची लढाई विचाराने लढूया, कुठल्याही संघटनेत अशा घटना घडू नयेत : सुळे

टीम महाराष्ट्र देशा : भाजपसाठी संकटमोचक ठरणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या होमग्राउंड जळगावमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी पहायला मिळाली आहे. हाणामारी कार्यकर्त्यांमध्ये अथवा दोन वेगळ्यापक्षातील नेत्यांमध्ये झाली नसून भाजपच्याच जेष्ठ नेत्यांमध्ये झाली आहे.

अमळनेर येथे बुधवारी भाजपच्या मेळाव्यात दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ट्रोल करण्यात येत आहे.जळगावमध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांमधील मारामारी दुर्देवी घटना आहे. देशातील कोणत्याही पक्षात असे घडणे चुकीचे आहे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुळे बोलताना महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे. विचारांची लढाई आपल्याला लढायची आहे. त्यामुळे कुठल्याही संघटनेत अशा घटना घडू नयेत. सर्वच राजकीय पक्षांना अंतर्मुख करायला लावणारी ही घटना आहे. मी या घटनेचा निषेध व्यक्त करते,’ असे सुळे यांना सांगितले.