प्रतीक्षा निकालाची : माढ्यातील लढाई संजयमामा विरुद्ध रणजितसिंह नव्हे तर पवार विरुद्ध फडणवीस

sharad pawar and devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा- माढा लोकसभा मतदारसंघाकडे भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष प्रतिष्ठेची लढाई म्हणून बघत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी आता भाजपने आता चांगलीच कंबर कसली आहे. माढ्यात संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह निंबाळरांमध्ये अटीतटीची लढाई होत आहे. मात्र या मतदारसंघातील लढाई जरी संजय शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात होत असली तरी ही लढाई राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र यांच्यामध्येच होत असल्याचे चित्र आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासून राजकीय उलथापालथ झाली, त्यामुळे मार्च – एप्रिलमध्येच नेत्यांना घाम फुटल्याचं पहायला मिळालं, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश, संजय मामा शिंदे यांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी, मोहिते पाटील यांच्या ऐवजी फलटणच्या रणजितसिंह निंबाळकरांना भाजपने दिलेली उमेदवारी मतदारसंघात चर्चेचा विषय ठरली आहे.माढा मतदारसंघातील लढाई उमेदवारी निश्‍चितीपासून ते प्रचार यंत्रणा राबविण्यापर्यंत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डावपेचातून होत आहे. या डावपेचात काँग्रेस-राष्ट्रवादीतील मंडळींना आपल्या गोटात ओढण्याचे काम केल्याचे पहायला मिळाले.

Loading...

संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह निंबाळरांमध्ये सामना

माढा लोकसभेसाठी राष्ट्र्वादी कॉंग्रेसकडून संजय मामा शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपने फलटणचे रणजितसिंह निंबाळकर यांना मैदानात उतरवले आहे, शिंदे यांच्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ, रामराजे नाईक निंबाळकर, अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, दिलीप सोपल, बबनदादा शिंदे यांनी सभा घेतल्या आहेत.

भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, राम शिंदे, महादेव जानकर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सभा घेतल्या आहेत. निंबाळकर यांच्या संपूर्ण प्रचाराची धुरा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांभाळली आहे, तर खा विजयसिंह मोहिते पाटील यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभा
माढा
माळशिरस
सांगोला
करमाळा
फलटण
माण – खटावएकूण मतदार संख्या – १८ लाख ८६ हजार

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार