भारत बंद : कोल्हापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

कोल्हापूर : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदमध्ये विरोधक आज रस्त्यावर उतरलेले होते. ठिकठिकाणी निदर्शनं, रास्ता रोको केला गेला मात्र, कोल्हापूरमध्ये भारत बंदसाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये काँग्रेसच्याच आंदोलनकर्त्यांमध्येच मारामारी झाली.

काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या दुचाकीवरून आलेल्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या गटातील कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे मार खाणाऱ्या कार्यकर्त्यांची सुटका झाली आणि हा वाद मिटला. मध्यवर्ती बस स्थानक जवळ असणाणार्या काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोरच ही हाणामारी झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली.