fbpx

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून दोन शेतकरी नेते आमने-सामने

टीम महाराष्ट्र देशा : शेती आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत हे माझ्याच तालमीत तयार झाले आहेत. मात्र त्यांनी स्वार्थामुळे शेतकरी हिताला तिलांजली दिल. व्यक्तिगत हव्यासापोटी यांनी शेतकऱ्यांना खेळवत ठेवले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपसह सर्वच पक्षांचे आमदार, खासदार यांचे शेतकऱ्यांना मारण्याचे धोरण आहे. सत्तेत जाऊन लोण्याचा गोळा खाणाऱ्या आमदार आणि खासदारांनी शेतकऱ्यांबरोबर केलेली गद्दारी दाखवून देण्याची वेळ आली आहे. असा घणाघात रघुनाथदादा पाटलांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी मी आजपर्यंत धडपडत आलो आहे. यापुढेही तोच माझा प्रयत्न राहणार आहे. माझ्या उमेदवारीला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सर्वसामान्य शेतकर्यांच्या कष्टाला न्याय मिळवून देण्याचा माझा राहील. अस रघुनाथदादा पाटील म्हणाले.