जास्तीचे पैसे घेण्यावरून महिलेचा रिक्षाचालकासोबत वाद

औरंगाबाद : मोंढा नाका सिग्नलवर रिक्षातून उतरलेल्या महिलेकडून जास्तीचे पैसे मागणाऱ्या रिक्षाचालकासोबत वाद घालत शिवीगाळ केल्याची घटना आज दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. याठिकाणी मोठी गर्दी जमली होती यानंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत वाद मिटवत गर्दी पांगविली.

याविषयी अधिक माहिती अशी कि, धूत हॉस्पिटल समोरुन बसलेल्या एक महिला बसून, मोंढा नाका सिग्नलवर उतरली. रिक्षाचालकाने २० रुपये प्रवासी भाडे महिलेला मागितले. परंतु २० रुपये प्रवासी भाडे जास्तीचे असल्याचे कारण दाखवत महिलेने रिक्षालकाला १५ रुपये प्रवासी भाडे घेण्यास सांगितले. परंतु रिक्षाचालकाने १५ रुपये घेण्यास नकार दिला. महिलेने रिक्षाचालकासोबत मोठं मोठ्याने वाद घालत गर्दी जमा केली. गर्दीतील एका तरुणाने फुशारकी मारत रिक्षाचालकाला शिवीगाळ करत मारहाण केली. हा वाद चालू असताना पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती मिळाली, माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी जात वाद मिटवत जमलेली गर्दी पांगविली.