भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचाराविरोधात लढा द्यावा – मुख्यमंत्री

मुंबई : शौर्य आणि त्यागाची पूजा केली जाते. आपल्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलिदान करणाऱ्या वीर जवान आणि शहिदांकडून युवा पिढीने प्रेरणा घेऊन भ्रष्टाचार, अनाचार आणि अत्याचाराविरोधात लढा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. अथर्व फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘वन फॉर ऑल, ऑल फॉर वन’ या वीर जवान आणि शहिदांच्या कुटुंबियांच्या सन्मानार्थ आयोजित ट्रीब्युट टू आर्मी ॲण्ड सॅल्यूट टू सोल्जर्स कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहिदांच्या कुटुंबियांना शासनाकडून पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणाही केली. एनएससीआयच्या स्टेडीयममध्ये हा कार्यक्रम झाला.कार्यक्रमास आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, परमवीर चक्र शौर्य पदक प्राप्त नायब सुभेदार संजयकुमार, महावीर चक्र पदक प्राप्त निवृत्त विंग कमांडर जगमोहन नाथ, परमवीर चक्र पदक प्राप्त निवृत्त कॅप्टन बानासिंग, आमदार आशिष शेलार, कार्यक्रमाचे संयोजक अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील राणे, माजी क्रिकेटपटू कपिल देव, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, चित्रपट निर्माता दिग्दर्शक मधूर भांडारकर, डी.वाय.पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील, अभिनेता नील नितीन मुकेश, आफताब शिवदासानी, अमिषा पटेल, सोनल चौहान आदींची उपस्थिती होती.

Loading...

मुख्यमंत्री म्हणाले, भारतात मान-सत्ता-धन यांची पूजा केली जात नाही, तर शौर्य आणि त्यागाची पूजा केली जाते. देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या वीर जवानांचीही पूजा केली जाते. या वीर जवानांच्या शौर्याच्या गाथा या नेहमीच अतुलनीय अशाच असतात. त्याच्या या शौर्याची गाथा सर्वांपर्यंत पोहचविण्याची गरज असते. अशा कार्यक्रमातून या शौर्यगाथा आपल्यापर्यंत पोहचतात. युवा पिढीने या गाथांतून त्याग आणि समर्पणाची प्रेरणा घेणे आवश्यक आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनातही भ्रष्टाचार, अनाचार आणि अत्याचारा विरोधात लढा द्यावा. शहिदांच्या जीवनाची प्रेरणा घेऊन, देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.शहिदांच्या बलिदानाचे मोल कधीही करता येणार नाही, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी शहिदांच्या कुटुंबियांना वीस लाख रुपये देण्यात येत होते. त्यामध्ये वाढ करून, ती पंचवीस लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणाही केली.केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, शहिदांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ऋणातून कदापिही उतराई होता येणार नाही. देशाच्या सर्वांगिण विकासात वीर जवानांच्या सीमेवरील कर्तृत्वाचे योगदान निश्चितच मोठे असते. त्यामुळे इतिहास लिहिताना त्यांचा उल्लेख निश्चितच करावा लागतो. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाचे आणि बलिदानाचे स्मरण करता येते.

यातून आपण राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करण्यास सज्ज होऊ या. अन्य कुठल्याही बाबींपेक्षा देश श्रेष्ठ हे ध्यानात घेऊन, एकता आणि अखंडतेसाठी काम करू या.आसामचे राज्यपाल मुखी यांनीही आपल्या भाषणात शहीद कुटुंबियांप्रती सन्मानाची भावना संवर्धित करण्यासाठी स्वयंसेवी संस्था संघटनांनी पुढे येण्याचे आवाहन केले.सुरुवातीला अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. राणे यांनी प्रास्ताविक केले. लेफ्टनंट जनरल विश्र्वंभर सिंह यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास तीनही सेना दलातील वीर जवान त्यांचे कुटुंबीय,तसेच शहिदांचे कुटुंबीय आदींसह राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्र, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'