मुंबई: फुटबॉल वर्ल्ड कपसाठी पात्रता फेरीचे सामने सध्या सुरु आहेत. ज्यात अर्जेंटिना विरुद्ध चिली यांच्यात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने चिलीला २-१ ने पराभूत केले आहे. अर्जेंटिनाच्या एंजल डी मारिया आणि लॉटारो मार्टिनेझ यांनी संघाला विजय मिळवून दिला आहे. दरम्यान अर्जेंटिना २८ सामन्यात अपराजित राहिली आहे.
अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीला कोरोनाची लागण झाली होती. तो पात्रता फेरीत खेळत नसल्याने अर्जेंटिना संघ संकटात सापडेल असे चाहत्यांना वाटले होते. सोबतच कोच लिओनेल स्कोलोनी यांना सुद्धा विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र अशा परिस्तिथीतही अर्जेंटिना संघाने चांगली कामगिरी करत १३ पॉइंट्सने वर्ल्डकपमध्ये प्रवेश केला आहे. पात्रता फेरीच्या सामन्यात १० मिनिटांच्या आत पहिला गोल केला. तर चिलीच्या इंग्लिश स्ट्रायकर बेन ब्रेरेटन यानेही एक गोल करत बरोबरी केली. मात्र हाल्फ टाईमच्या आधी चिलीचा गोल किपर क्लॉडिओ ब्राव्होच्या दुखापतग्रस्त झाला. ज्याचा फायदा घेत अर्जेंटिनाने ११व्या मिनिटाला आपला विजय निश्चित केला.
“लिओ असल्यावर आमच्यासाठी सगळे काही सोपे होते. मात्र महत्वाचे हे आहे कि आम्ही असेच खेळात राहावे आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांना आनंदित करत राहावं” अशा शब्दात डी मारियाने आनंद व्यक्त केला आहे. अर्जेंटिना आधी ब्राझीलचा संघ फिफा वर्ल्ड कप २०२२ साठी पात्र ठरला आहे. २१ नोव्हेंबरपासून कतार मध्ये फिफा वर्ल्डकप २०२२ ची सुरुवात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- चिकलठाणा ते जिजाऊ चौक उजळून निघणार; आदित्य ठाकरेंनी केले प्रकाशमान रस्त्याचे उद्घाटन!
- …अशा प्रकारचे निलंबन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही- देवेंद्र फडणवीस
- “सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही”, निलंबन मागे घेतल्यानंतर अशिष शेलारांची प्रतिक्रिया
- चंद्रकांत योगा लॉन्स अन् इम्तियाज सूर्यकुंड शेजारी-शेजारी; औरंगाबादेत पांडेयजींनी केली कमाल!
- नितेश राणे कोर्टात शरण; आता सोमवारी होणार सुनावणी