fbpx

फिफा वर्ल्ड कप 2019 : विजय जल्लोष साजरा केल्यानंतर मॅराडोना पडला बेशुद्ध

टिम महाराष्ट्र देशा : काल झालेला  अर्जेन्टिना  विरुद्ध नायजेरियाचा सामना अक्षरशः ह्रदयाची ठोके चुकविणारा ठरला. अंतिम १६ मध्ये पोहोचण्यासाठी नायजेरियाला हरवणे अर्जेन्टिनासाठी अनिवार्य बनले होते. शेवटच्या काही क्षणापूर्वी रोजोने गोल करीत  अर्जेन्टिनाचा विजय निश्चित केला. या विजयानंतर त्यांनी बाद फेरीत प्रवेश केला.

अर्जेंटीनाला वर्ल्ड कप जिंकून देणारा महान खेळाडू दियागो मॅराडोनाही  हा सामना पाहण्यासाठी उपस्तित होता.बरोबरीनंतर अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात जेव्हा अर्जेंटीनाकडून मेस्सीने पहिला गोल  केला तेव्हा मॅराडोनाने जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली.यावेळी अचानक चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. त्यांनतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फिफा २०१८ च्या या  वर्ल्ड कपमध्ये  अर्जेंटीनाचा हा पहिलाच विजय ठरला. याआधीच्या सामन्यात त्यांना आइसलँड बरोबरच्या  सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. तर दुसऱ्या सामन्यात क्रोएशियाकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला . यामुळे अर्जेंटीनाला बाद फेरीत प्रवेश करणे कठीण बनले होते.  मात्र, नायजेरीयाविरुद्धच्या विजयाने तीन सामन्यात चार गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवत अंतिम १६मध्ये प्रवेश मिळवला.