… तर मल्टीप्लेक्समध्ये कोणताचा प्राईमटाईम होऊ देणार नाही – जितेंद्र आव्हाड

'फर्जंद'साठी राष्ट्रवादी रणांगणात

ठाणे : शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या मावळ्यांच्या कर्तबगारीवर आधारीत ‘फर्जंद’ या सिनेमाला मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईम देण्यात यावा, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली असून जर, फर्जंदला प्राईम टाईम दिला नाही. तर,मल्टीप्लेक्समध्ये कोणताचा प्राईमटाईम होऊ देणार नाही, असा इशाराही दिला आहे.

शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या मावळ्यांच्या कर्तबगारीवर आधारीत ‘फर्जंद’ या सिनेमाला मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईम देण्यात येत नाही. याची माहिती मिळताच आ. जितेंद्र् आव्हाड यांनी सिने पोलीस सिनेमा या विवियाना मॉलमधील मल्टीप्लेक्स थिएटरला निवेदन देऊन हा इशारा दिला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये मावळ्यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्याच कर्तबगारीवर हा ’फर्जंद’ हा सिनेमा आधारीत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटला असला तरी त्यास मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईम दिला जात नाही. ही सबंध महाराष्ट्राची शोकांतिका आहे.

या मातीत घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एकही मल्टीप्लेक्समध्ये हा सिनेमा न दाखवण्याची कृती जाणीवपूर्वक केली जात आहे. त्यामुळे येत्या 24 तासात मुंबईसह इतर मेट्रो शहरातील मल्टीप्लेक्समध्ये ‘फर्जंद’ या सिनेमाला प्राईम टाईम देण्यात आला नाही. तर, शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही या मल्टीप्लेक्समध्ये कोणताच प्राईम टाईम होऊ देणार नाही, असे या निवेदनामध्ये आ. आव्हाड यांनी नमूद केले आहे.