दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानाच्या प्रवेशद्वाराला सेहवागचं नाव

sehwag-stedium-

दिल्ली : दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानाला टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागचं नाव देण्यात आलं आहे. कोटला मैदानाचं दुसऱ्या क्रमांकाचं प्रवेशद्वार सेहवागच्या नावाने ओळखलं जाणार आहे. सेहवागने काही माजी खेळाडूंच्या उपस्थितीत या प्रवेशद्वाराचं उद्घाटन केलं. डीडीसीएचा हा सकारात्मक निर्णय असल्याचं सेहवाग म्हणाला. शिवाय येत्या काळात ड्रेसिंग रुम, स्टँड आणि प्रवेशद्वारांना इतर खेळाडूचं नाव देण्यात येईल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.