फर्ग्युसन कॉलेज होणार आता फर्ग्युसन युनिव्हर्सिटी !

मुंबई : पुण्यातील जुने व प्रख्यात फर्ग्युसन कॉलेज स्वायत्त संस्थेचे फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये रुपांतर करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.

त्यामुळे आता फर्ग्युसन कॉलेजचे रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे. आज मुंबईत येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आहे.

फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ, व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे.

सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व विज्ञान या शाखा असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. फर्ग्युसन महाविद्यालयाला इ.स. २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे.

एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.