व्हायरल स्टोरी- या फोटो मागील सत्य तुम्हाला माहित आहे का ?

-felt-helpless-frustrated-photo-of-cop-pleading-with-repeat-offender-goes-viral/story-

सोशल मिडीयावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. प्रत्येक फोटो मागे एक सत्य असत. असाच एक फोटो गेली काही दिवस सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तो फोटो असा आहे एका दुचाकी गाडीवर पाच जणांच एक कुटुंब चाले आहे. दुचाकी चालकाने वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवत हा चालक हेल्मेट न घालता गाडी चालवत आहे. एक पोलीस अधिकारी त्या वाहन चालकापुढे हात जोडून विनंती करीत आहे.

काय आहे हे व्हायरल सत्य

व्हायरल झालेला हा फोटो आंध्रप्रदेश येथील अनंतपुरा येथील आहे. अनंतापुरा येथे वाहतूक सुरक्षितेसाठी एक अभियान राबविण्यात आले होते. नागरिक अनेक वेळा वाहतुकीचे नियम तोडतात, त्यांना दंड,शिक्षा करून देखील ते ऐकत नाही. शेवटी वैतागून एका पोलीस अधिकाऱ्याने नियम तोडणाऱ्याला चालकासमोर हात जोडले आहेत.

बी. सुभासकुमार हे हात जोडलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर हनुमंतारायडू  हे चालकाचे नाव आहे.  एका दुचाकी गाडीवर पाचजण बसले आहे आहेत. त्यात लहान बालकांचा देखील समावेश आहे हे पाहिल्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याला हात जोडण्याशिवाय दुसरा योग्य पर्याय वाटला नाही. याविषयी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले तो चालक नेहमी वाहतुकीचे नियम तोडतो वारंवार सांगून देखील त्याला काही फरक पडत नाही. मी हात जोडले तेव्हा देखील तो हसत होता. मी त्याला समजून सागितले की तुझ्या मुलांच्या सुरक्षितेची जबाबदारी तुझी आहे. समोर टाकीवर बसलेल्या मुलाचा पाय लागून जर अपघात झाला तर ते तुला परवडणार आहे का ? खूप महागात पडेल समजून सांगितल्या नंतर त्या चालकाच्या लक्षात त्याची चूक  आली. हा सर्व प्रकार घडत असताना कोणी एका व्यक्तीने फोटो काढला व त्या क्षेत्राच्या आय.पी. एस कडे पाठविला. आय.पी. एस अभिषेक गोयल यांनी हा फोटो त्यांच्या टीवटर वर शेअर करीत आम्ही या पेक्षा अधिक काय करू शकतो असा सवाल केला आहे. फोटो शेअर केल्यानंतर काही तासात तो प्रचंड व्हायरल झाला.