fbpx

‘ये मोहब्बद भी क्या चिज है, ना जिने देती है ना मरने’… उत्तकपत्रिकेतच लिहिली प्रेमकथा

टीम महाराष्ट्र देशा : ‘ये मोहब्बद भी त्या चिज है, ना जिने देती है ना मरने… सर इस लव्ह स्टोरीने पढाई से दूर कर दिया वरना…’ असं एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं आहे. परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेत उत्तर प्रदेशातील एका विद्यार्थ्याने त्याची प्रेमकथा लिहिल्याची घटना घडली आहे. त्याचं कुठल्या मुलीवर प्रेम आहे? हे सुद्धा या विद्यार्थ्याने उत्तकपत्रिकेत लिहिलं आहे. ”आय लव्ह माय पूजा” असं या विद्यार्थ्याने ठळक अक्षरात रसायनशास्त्राच्या उत्तरपत्रिकेत लिहिलं आहे.

उत्तर प्रदेशाच इंटरमिडिएट परीक्षेतीली ही घटना आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. आजकाल विद्यार्थी उत्तरपत्रिकेत पास होण्यासाठी अजब फंडे वापरत आहेत. काही काही मुलांनी उत्तरपत्रिकेवर नोटा स्टेपलर करून दिल्या. तसंच काही उत्तरपत्रिकांवर विचित्र मेसेजही लिहिण्यात आले आहे. ‘सरांना पेपर उघडण्याआधी नमस्कार. सर पास करून टाका, असे मेसेज विद्यार्थ्यांनी लिहिलं आहेत. परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांनी भावूक मेसेजही लिहिले आहेत.