fbpx

राज्यभरात २ फेब्रुवारी रोजी शिक्षकांचे ‘कॉलेज बंद’ आंदोलन

february 2 junior college teachers state wide agitation

मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी आणि त्यांची पूर्तता व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन राज्यात पाच टप्प्यात होणार असून चौथ्या टप्प्यात २ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व ‘कनिष्ठ महाविद्यालये बंद’ करून सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर व मुंबईत आझाद मैदान येथे ‘जेलभरो ‘ आंदोलन करण्यात येईल.

१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणे, सर्व शिक्षकांना २४ वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी देणे, माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे, सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा. या व अन्य ३२ मागण्यांचे निवेदन शासनास देण्यात आल्याचे म.रा.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी सांगितले.

शासनाने तातडीने मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत आदेश न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व नाईलाजाने १२ वी बोर्ड परीक्षेच्या काळात ‘बहिष्कार आंदोलन’ करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाचीच असेल असा इशारा संघटने तर्फे देण्यात आला आहे.

1 Comment

Click here to post a comment