भाजपला अजून एक झटका आमदार आशिष देशमुख देणार राजीनामा !

टीम महाराष्ट्र देशा: वेगळ्या विदर्भाबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्याचं उत्तर अद्याप मिळालं नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य भाजपचे काटोलचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केलं आहे.

याआधी नाना पटोले यांनी बंड करत आपला राजीनामा दिला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपवर कमालीचे नाराज आहेत आणि त्यांनी अनेक विरोधी मंचावर आपली नाराजी उघड व्यक्त केली देखीक आहे.

Loading...

आता यात भर म्हणजे भाजपचे काटोलचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी तर राजीनामा देणार असल्याच जाहीर करून भाजपच्या अडचणीत अजूनच भर घातली आहे. देशमुख यांची ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ चंद्रपुरात पोहचली आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपला कोंडीत पकडून त्यांनी ही यात्रा सुरु केली आहे.

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ७ जानेवारीपासून ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने बेरोजगार, शेतकरी, शेतमजुर आदींशी संवाद साधला जात आहे. विदर्भ विकासासाठी विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. शिवसेना ही विदर्भ राज्य निर्मितीसाठी विरोध करीत असल्याने ती सरकारच्या गळ्याची हड्डी झाली होती. शिवसेनेने पुढील काळात स्वतंत्र निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. याच संधीचे सोने विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने केले पाहिजे. मागणीचा वेळीच विचार न झाल्यास आपण राजीनामाही देऊ, अशी माहिती आ. आशिष देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले