मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ठाकरेंनी त्यांच्या अट मान्य न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर २ दिवसात तब्बल १०६ शासन निर्णय निघाले आहे.
२ दिवसात तब्बल १०६ शासन निर्णय निघाले, यामध्ये सर्वाधिक जीआर पाणीपुरवठा व जलसंधारण विभागाचे आहेत. पाणीपुरवठा योजनांना मंजुरी व कोल्हापुरी, सिमेंट बंधाऱ्यांना अंदाजपत्रकीय किमती दीडपट करण्याचे निर्णय घेतले आहेत. एका दिवसाचे कामाचे ८ तास गृहीत धरले तर प्रत्येक नवव्या मिनिटाला एक जीआर जारी झाला आहे. शक्यतो दररोज सरासरी २० ते ३० जीआर निघतात. मात्र १५ जून ते २२ जून या ८ दिवसांमध्ये ३०३ जीआर निघाले आहेत. यावरून सरकार कोसळण्याची भीतीचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
प्रकाश आंबेडकरांचं ट्विट –
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 23, 2022
“एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?” असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबेडकरांच्या या ट्विटनंतर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या –