fbpx

नर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती 

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ नर्मदा नदीतून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गावातील काही लोक नदीच्या पलीकडे आंघोळीसाठी बोटीने जात होते. यावेळी ही बोट अचानक बुडाली. त्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जन जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज  मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गावातील काही लोकं नदीच्या पलीकडे आंघोळीसाठी बोटीने जात होते. त्यावेळी अचानक ही बोट बुडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत 5 जणांचा मृ्त्यू झाला.  20 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.  जखमींना धडगावाच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. नेमकी ही बोट कशामुळे बुडाली हे मात्र, अद्याप कळू शकले नाही.