चीन्यांचा आणखी एक प्रताप; रॉकेटवरील नियंत्रण सुटल्याने कोणत्याही ठिकाणी कोसळण्याची भीती

नवी दिल्ली : चीनमध्ये उत्पत्ती झालेल्या कोरोना संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. चीन जरी स्वतः यातून सावरला असला तरी जगभरातील अनेक देश या गंभीर संकटाशी सामना करत आहेत. या रोगामुळे लाखो लोकांनी प्राण गमावला असून चीनने मात्र या संसर्गाच्या उत्पत्तशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

जगभरात या रोगाचे परिणाम भोगावे लागत असतानाच आता चीन्यांचा आणखी एक प्रताप महागात पडण्याची शक्यता आहे. चीनने अवकाशात सोडलेल्या लाँग मार्च 5ब रॉकेटवरील नियंत्रण सुटल्यानं नवी समस्या निर्माण झाली आहे. या २१ टन वजनाच्या रॉकेटवरील नियंत्रण तुटल्याने ते नक्की कुठे पडेल याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने 29 एप्रिलला 21 टन वजनाचं लाँग मार्च 5ब रॉकेट लाँच केलं होतं. नियंत्रित कार्यक्रमानुसार हे रॉकेट महासागरात पडणं अपेक्षित होतं. मात्र, आता त्यावरील नियंत्रण तुटल्याने ते नेमकं पृथ्वीच्या कोणत्या भागात पडेल यावर काही ठोस सांगण्यात आलेलं नाही.

कधी व कुठे कोसळण्याची शक्यता ?

चीनच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचं वृत्तांकन करणाऱ्या पत्रकार अँण्ड्रू जोन्स यांच्या अंदाजानुसार रॉकेट न्यूयॉर्क, मद्रिद बीजिंग आणि दक्षिण चिली, वेलिंग्टन, न्यूझीलंड या भागात कोसळू शकतं. हे कधी कोसळेल याची देखील ठोस माहिती नसून येत्या काही दिवसात हे पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता देखील अँण्ड्रू जोन्स यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या