मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ठाकरेंनी त्यांच्या अट मान्य न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर IAS, IPS अधिकाऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे.
राजकीय बंडामुळे IAS, IPS अधिकाऱ्यांमध्ये मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. मर्जीतले अधिकारी नेमणूक केल्याचा आरोप विरोधकांनी ठाकरे सरकारवर केला होता. आता जर विरोधक सत्तेत आले तर साईड पोस्टींग मिळण्याची भीती या आधिकाऱ्यांना आहे.
दरम्यान या राजकीय गदारोळावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. “शिवसेनेच्या आमदारांनी मला येऊन सांगावं की, तुम्ही मुख्यमंत्री नकोय आम्हाला. फक्त समोर येऊन सांगावं किंवा माध्यमांच्या सहाय्याने संवाद साधला तरी चालेल पण मी मुख्यमंत्री नकोय असे जेव्हा ते त्यांच्या तोंडून सांगतील त्या क्षणी मी राजीनामा देईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पवारांची राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक –
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. शरद पवार राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. आमचे सरकार पाडण्याचा हा तिसरा प्रयत्न असल्याचे पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या –