पवार यांनी मोदींची कधीही पाठराखण केलेली नाही : फौजिया खान

टीम महाराष्ट्र देशा- केंद्र सरकार म्हणजे एकटे नरेंद्र मोदीच दिसत आहेत. कोणत्याही निर्णयात मंत्र्यांचा सहभाग दिसत नाही. एकटेच निर्णय घेतले जात आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही हुकूमशाही लोकशाहीला घातक तर आहेच पण ही देश बुडवेल, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी लातूर येथे पत्रकार परिषदेत केली. पक्षाच्या वतीने संविधान बचाव , देश बचाव अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान शुक्रवारी लातूर येथे आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे नऊ ऑक्टोबर रोजी या अभियानाचा समारोप होणार आहे.

देशात आज संविधान सुरक्षित नाही. संविधानाची प्रत जाळली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी दिली जात आहे. ही बाब गंभीर आहे, हा देशद्रोह आहे. मन की बात करणारे मोदी यावर मात्र बोलत नाहीत. संविधान त्यांना नको आहे, लोकशाही नको आहे. हुकूमशाही त्यांना पाहिजे आहे. सध्या देशात अघोषित आणीबाणी लागू आहे, असे त्या म्हणाल्या.

Loading...

राज्यात महिला व मुली असुरक्षित असताना मुख्यमंत्री फडणवीस मात्र स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. देशात व राज्यात कॉर्पोरेट भ्रष्टाचार वाढला आहे. राफेल विमान खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. पवार यांनी मोदी यांची कधीही पाठराखण केलेली नाही. राफेल विमान खरेदीबाबत त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी आमदार विद्या चव्हाण, आशा भिसे, राजलक्ष्मी भोसले, सोनाली देशमुख, बसवराज पाटील नागराळकर, संजय शेटे, मुर्जूजा खान, अफसर शेख आदी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील