fbpx

मंदसौर बलात्कार : भरपाई राहूद्या तुम्हालाच, आम्हाला न्याय हवा

टीम महाराष्ट्र देशा : आम्हाला भरपाई वगैर काही नको, फक्त त्या नराधमांना फासावर लटकवा. अशी मागणी मंदसौरमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या आई वडिलांनी केली आहे. मला माझ्या मुलीला न्याय हवा आहे बाकी कशाचीही आम्हाला अपेक्षा नाही, अस मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे.

दरम्यान मंदसौरमध्ये राहणारी सात वर्षांची मुलगी मंगळवारी शाळेत गेली होती. ती दुसरी इयत्तेत शिकते. मंगळवारी संध्याकाळी तिचे आजोबा तिला घेण्यासाठी शाळेत गेले असता १५ मिनिटांपूर्वीच ती शाळेतून निघून गेल्याचे समजले. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेच दिसत नव्हती. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनीही मुलीचा शोध सुरु केला.

बुधवारी सकाळी दहा वाजता लक्ष्मण गेटजवळील झाडाझुडपात पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. तिच्या शरीरावर जखमा होत्या. तिच्या बाजूला बीयरच्या बॉटलचे तुकडे होते. तिच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला इंदौरमधील रुग्णालयात हलवण्यात आले.

‘बलात्कार करणाऱ्यांनी मुलीचे अतोनात हाल केले, या मुलीच्या संपूर्ण शरिरावर जखमा असून बलात्काऱ्यांनी या मुलीचं नाक चावून तोडून टाकलं आहे, यामुळे तिच्या नाकाचे हाड तुटलं असून तिला श्वासही घेता येत नाहीये. श्वास घेण्यासाठी तिच्या नाकात एक ट्यूब टाकण्यात आली आहे. या नराधमांनी तिच्या गुप्तांगातही काठ्या घुसवल्याने तिला जबरदस्त इजा झाली आहे. या मुलीवर गुरुवारी सहा तास शस्त्रक्रीया करण्यात आली आहे’, अस डॉक्टरांनी सांगितले आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी इरफान उर्फ भय्यू याला अटक केली आहे. इरफानने नातेवाईक आजारी असल्याचे सांगत पीडित मुलीला स्वत:सोबत नेले. त्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली असून या घटनेने मंदसौरमध्ये सर्वत्र संतप्त व्यक्त होत आहे.