दिब्रिटो यांच्या निवडीला हिंदुत्त्ववादी संघटनांचा विरोध तर आंबेडकरी संघटना समर्थनार्थ

टीम महाराष्ट्र देशा : उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीला अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. राज्यभरातून अनेक हिंदुत्त्ववादी संघटनाकडून विरोध होत असताना मात्र रिपब्लिकन युवा मोर्चा आणि आंबेडकरी चळवळीने दिब्रिटो यांच्या निवडीला पाठिबा दर्शविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिब्रिटो यांचे साहित्य हे जात धर्मापलीकडील असून वैश्विक समतावादी मानवतेचा पुरस्कार करणारे आहे. साहित्यातील वैचारिक वाद मान्य केले जाऊ शकतात. मात्र त्यांचा धर्म वेगळा आहे म्हणून त्यांची निवड नाकारली जाऊ नये. या हेतूने रिपब्लिकन युवा मोर्चा, आंबेडकरी चळवळ आणि मराठी साहित्य परिषदेला या संघटनांनी पाठींबा देत असल्याचे पक्षनेता राहुल डंबाळे यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी मराठी साहित्य महामंडळाने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिब्रिटो यांची निवड केल्यानंतर अनेक हिंदुत्त्ववादी संघटनानी त्यांना विरोध केला आहे. तसेच साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धमक्यांचे फोनही आले. तर काहींनी मराठी साहित्यिकांवर टीकाही केली.

आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ, रानकवी ना. धों. महानोर, ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे आदी साहित्यिकांची नावे सहा महिन्यांपासून चर्चेत होती. यात चपळगावकर वगळता इतर सर्वांनी जाहीरपणे नकार कळवला होता. त्यामुळे मराठवाड्याबाहेरील सर्वमान्य नाव असलेल्या दिब्रिटोंना पसंती देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या