संमेलनाध्यक्षपदी दिब्रिटो यांच्या निवडीमुळे साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्यांना धमक्यांचे फोन

टीम महाराष्ट्र देशा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची रविवारी निवड करण्यात आली. मात्र त्यांच्या निवडीला अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे राज्यात साहित्य संमेलनामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत. इतकेच नव्हे तर संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती धर्मगुरु फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड का केली? असे धमक्यांचे फोन साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना येत आहेत.

तुमचा दुर्योधन करू, तुम्हाला पाहून घेऊ अश्या धमक्यांचे फोन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, महामंडळाचे कार्यवाह मिलिंद जोशी यांना धमक्यांचे फोन येत आहे. याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नसली तरी आतापर्यंत ठाले पाटील यांना जवळपास २० ते २५ फोन आले आहेत. धमक्यांच्या फोनबाबत ठाले पाटील यांनी त्याने मत मांडले आहे. ते म्हणाले, साहित्य महामंडळात एकमताने दिब्रिटो यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सर्वच स्तरातून दिब्रिटो यांच्या निवडीचं स्वागत होत आहे. मात्र फोन करणाऱ्यांनाही त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे.

कृतिशील विचारवंत आणि सुधारणावादी लेखक ही फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांनी १९८३ ते २००७ या कालावधीत सुवार्ता या मासिकातून त्यांनी अनेक प्रबोधनात्मक विषय मांडले आहेत. पुण्यात झालेल्या १५ व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच ‘सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा २०१३ सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे. परंतु दिब्रिटो हे सक्तीने धर्मांतर करतात आणि त्यांनी हिंदू संतांचे विचार अंगिकारले नाहीत. मराठी साहित्यात दिब्रिटो यांचं काम शून्य आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या लेखनातून मराठी साहित्यातील कोणताही विचार त्यांनी इतरांपर्यंत पोहोचविल्याचे आढळून येत नाही. असे मत काही हिंदुत्त्ववादी संघटनांच्या प्रमुखांनी मांडले आहे. त्यामुळे दिब्रिटो यांच्या संमेलनाध्यक्ष पदासाठी विरोध केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...

Loading...