fbpx

ग्रामविकास मंत्र्याच्या आणि विरोधी पक्षनेत्याच्या गावातचं अशुद्ध पाणी

टीम महाराष्ट्र देशा : बीड वासियांनी पाणी प्रश्नावरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकारची जबाबदारी केवळ टँकरने पाणी पुरवठा करण्याची नसून शुद्ध पाणी पुरवठा करण्याचीही आहे. असे बीड वासीयांनी म्हंटले आहे. तसेच दुष्काळ उपाययोजनांसाठी पाण्यासारखा पैसा पाण्यात घालूनही शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळत नाही. असा आरोपही त्यांनी केला.

सध्या राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जाव लागत आहे. दरम्यान, दुष्काळ उपाययोजनांसाठी पाण्यासारखा पैसा पाण्यात घालूनही शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्याचा आरोप बीडवासियांनी केला आहे. इतकेच नव्हे तर जनतेला अशुद्ध पाणी पाजण्याचे काम होत असताना कुठे आहे प्रशासन? कुठे आहे यंत्रणा? असा सवालही बीड वासियांनी केला आहे.

विशेष म्हणजे, बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना आधार देण्यासाठी आणि उपाययोजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र तरीही दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पोहोचत नाहीये. यासाठी नेमण्यात आलेले प्रशासकीय यंत्रणा कुठे आहे ? केवळ टँकरच्या खेपा कशा वाढतील याचा प्रयत्न सुरू आहे. टँकरने आणलेले पाणी अशुद्ध आहे. ज्या पाण्याने अंघोळही करावीशी वाटणार नाही ते पाणी जनतेला पिण्यासाठी दिले जात आहे.

टँकरने आणलेले पाणी कुठून येत आहे. ते शुद्ध आहे का? याची तपासणी प्रशासनाने करावी. सरकारची जबाबदारी केवळ टँकरने पाणी पुरवठा करण्याची नसून शुद्ध पाणी पुरवठा करण्याचीही आहे. असे बीड वासियांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे, मुंडे परिवाराचा गड मानला जाणाऱ्या बीड जिल्ह्यात एक ग्रामविकास मंत्री तर दुसरे विरोधी पक्ष नेते असूनही गाव वासीयांची ही अवस्था असले तर इतर जिल्हा वासियांनी कोणा कडे पाहावे. ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.