Share

Imran Khan । इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला, पाकिस्तानात खळबळ

Imran Khan। : सध्याच्या घडीला महत्वाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इम्रान खान (Imran Khan) यांच्या ताफ्यावर गोळीबार झाला. या गोळीबारातून इम्रान खान जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या आवाजाने रॅलीमध्ये एकच खळबळ उडाली.

हल्लेखोराने कंटेनरच्या खालून वरच्या दिशेने गोळीबार केल्याने पीटीआयचे नेते इम्रान खान (Imran Khan) यांच्या पायाला गोळी लागली. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खानच्या पायात गोळी लागल्यानंतर त्यांना बुलेटप्रूफ कारमधून रुग्णालयात नेण्यात आले. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

या घटनेमुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही गुजराँवाला येथे घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पाकिस्तानच्या गुजराँवाला येथे इम्रान खान यांच्या पक्षाची रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत इम्रान खान देखील सहभागी झाले होते. या रॅलीत अचानक काही हल्लेखोर घुसले आणि त्यांनी जवळपास सहा ते सात राऊंड फायर केले.

या हल्ल्यात पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये इम्रान खान (Imran Khan) देखील असल्याची माहिती मिळत आहेत. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पाकिस्तानच्या विद्यमान सरकारच्या विरोधात आक्रमक झालेले इम्रान खान सरकारच्या विरोधात दररोज रॅली काढत आहेत. त्यांच्याकडून आजसुद्धा आझादी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या रॅलीत सुरक्षेची कमतरता होती. त्यातूनच संबंधित घटना घडली असल्याचं समजतंय.

महत्वाच्या बातम्या :

Imran Khan। : सध्याच्या घडीला महत्वाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची …

पुढे वाचा

India Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now