नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ३० जखमी

मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बसला नगर शहराजवळ भीषण अपघात झाला. अपघातात मध्ये अल्ताफ अहमद  बसचालक याचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच  ३० डॉक्टर जखमी झाले आहेत. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

जखमींमध्ये १२ महिला डॉक्टर्स आहेत. सर्व जखमींना मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये  उपचार सुरु आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व डॉक्टर कॅन्सर तज्ज्ञ आहेत. रेडिएशन ओन्कलॉजी इतर वेगवेगळ्या विभागात ते कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे ४०डॉक्टरांचे पथक मुंबईहून औरंगाबादला मेडिकल कॉन्फरसला लक्झरी बसने निघाले होते. ही लक्झरी पहाटे पाच वाजेच्या सुमारास नील हॉटेलसमोर समोरून येणारा कंटेनर धडकला. हा अपघात इतका भीषण होता की अर्ध्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविले