एमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्याने उपोषण

पुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी या शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा पुतळा उभारण्यास संस्था गेल्या अनेक दिवसांपासून चालढकल करत आहे. त्याच्या निषेधार्थ, ‘छत्रपती शिवराय सन्मान कृती समिती’च्या कडून मंकर सक्रांतीच्या निमित्त साधून संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत चक्री उपोषन सुरु करण्यात आले आहे.

एमआयटी शिक्षण संस्थेच्या जगविख्यात घुमटामध्ये विविध विचारवंताचे ५४ पुतळे उभा करण्यात आले आहेत. या घुमटाचे काही महिन्यांपुर्वी उपराष्ट्रपती वेंकैया नायडु व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते.
”एमआयटी या शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा उभारण्यासाठी ‘छत्रपती शिवराय सन्मान कृती समिती’च्या माध्यमातुन मागील सहा महिन्यांपासुन प्रयत्न सुरु आहेत. लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी एमआयटी संस्थेचे कार्यंकारी संचालक मंगेश कराड व ‘छत्रपती शिवराय सन्मान कृती समिती’च्या कार्य़कर्त्यामध्ये दोन महिन्यांर्वी समेट घडवुन आणण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मंगेश कराड यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा संस्थेच्या आवारात उभारण्या संदर्भात होकारही दिला होता. मात्र पुतळा हा घुमटामध्येच हवा अशी कृती समितीची मागणी आहे. या मागणीसाठी मंगळवारपासुन चक्री उपोषन सुरु करण्यात आले आहे. अशी छत्रपती शिवराय सन्मान कृती समिती’चे मुख्य समन्वयक व राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी ग्राहक सरक्षंण समितीचे प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत गवळी, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष शिवदीप उंद्रे, दिलीप भोसले, रणधिर घोरपडे, दयानंद भुसे, सुनिल उंद्रे, नवनाथ धुमाळ, गणेश शिंदे, हरीष गोटे, अमोल भोसले आदी उपस्थित होते.