गरबा दांडीयासाठी खास फॅशन फंडा

भाग्यश्री खैरे

आज म्हारो गरबा रमतो जाययेलो पेला बाबू बिसना रमला लई ये…ढोल तारो ढोल बाजे…’ आदी गुजराती  हिंदी गाण्यावर  रंगीबेरंगी पेहरावातील युवक-युवतींचा दांडिया, गरबा रंगू लागतील.येणार नवरात्र अधिक रंगदार बनविण्यासाठी काही खास टीप.

२१ रोजी घटस्थापना असल्याने सगळीकडे नवरात्री साठी खरेदी ची लगबग चालू झालेली दिसत आहे .या नवरात्री मध्ये प्रत्येकाला आपला look वेगळा आणि आकर्षक कसा होईल याच्या कडे जास्त लक्ष आहे तसेच नवीन गाण्यावर गरबा music add करून नवीन गाणी तयार करण्याची तयारी चालू झालीये.या वर्षी जास्त भर” सोनू ” च्या गाण्यावर असणार यात शंका नाही.गरब्यामध्ये नृत्य व संगीताबरोबर पोशाखही फार आकर्षक असतात. स्त्रिया रंगीबेरंगी गुजराती साडी किंवा घेरदार लेहंगा (चनिया-चोली) घालतात. काठियावाडी पोशाखही त्याला म्हटले जाते. या     पोशाखावर सुंदर आरशांनी नक्षीकाम केलेले असते. गुजरातमधील सौराष्ट्र येथील संस्कृतीने समृद्ध अशा ‘काठियावाड’ या प्रदेशावरून हे नाव प्रचलित झाले आहे. गरबी नृत्यात पुरुषही छोटा कुडता व पायजमा घालतात व डोक्यावर फेटा बांधतात. महिलांचे घेरदार पोशाख गोलाकार पद्धतीने केलेल्या नृत्याची अधिकच शान वाढवतात.

पारंपरिक दागिनेदेखील घातले जातात, बिंदी, झुमके, कडे, कंबरपट्टा, माळ, पैंजण अशा दागिन्यांनी महिला नटतात व नवरात्री दरम्यान त्यांच्या सौंदर्यात विशेष भर पडते, हे मात्र मान्य करावंच लागेल!
या वर्षी इंडो वेस्टर्न कपडे जास्त खरेदी होताना दिसत आहेत .तसेच क्रेप कपड्याचा अनारकली ड्रेस विथ जॅकेट असा ट्रेंड आलाय इंडो वेस्टर्न मुले मुली या दोघांसाठी सूट होत आहे .
गरबा हे नृत्य नेत्रदीपक नृत्य आहे. गरब्याची गाणी चालू झाली की, आपोआपच शरीर ठेका धरतं
आजकाल गरब्याचा ट्रेण्ड मोठय़ा प्रमाणावर दिसून येतो व या पारंपरिक लोकनृत्याला व्यावसायिक, ग्लॅमरस स्वरूप प्राप्त झालं आहे. नवरात्रीच्या आधी गरबा शिकण्याचे वर्ग घेतले जातात व लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत सगळेच जण या वर्गाचा मोठय़ा प्रमाणात लाभ घेताना दिसत आहेत.
गुजराथी समाजापुरता हा सण मर्यादित राहिला नसून बहुभाषिक, आंतरदेशीय लोकसुद्धा उत्साहाने या सोहळ्यात सामील होताना दिसत आहेत. समाजातील एकजुटीसाठी लोकसंस्कृती कशी पोषक ठरते, याचा हा जणू दाखलाच आहे.
मोठय़ा पटांगणावर होणाऱ्या ‘गरबा डीजे’चं प्रमाण झपाटय़ाने वाढू लागलंय. काही ठिकाणी तर प्रतिदिवशी १०००-२००० रु. भरूनही गरबा खेळायला जाणाऱ्या लोकांच्या संख्येत भर पडत आहे. गरब्याच्या पारंपरिक गाण्यांबरोबर बॉलीवूड नंबरही गरब्यात वापरले जाऊ  लागलेत.
गरब्याची गाणीदेखील बॉलीवूडमध्ये हिट झाली आहेत, ‘ढोली तारो ढोल बाजे’, ‘नगाडा संग ढोल बाजे’ इ. बॉलीवूडमधील गरब्याची आधुनिक गाणीसुद्धा खूप लोकप्रिय आहेत. तसेच ‘गरबा’ हा सर्वसाधारण शब्द म्हणून वापरला जातो. मात्र यात स्त्री-पुरुष एकत्र खेळतात. दांडियाचाही समावेश केला जातो. पारंपरिक व नवीन गुजराथी गाण्यांबरोबर काही ठिकाणी मराठी गाण्यांवर ‘मराठी गरबा’ खेळला जातो.

<काही ठिकाणी डीजे असतो तर काही ठिकाणी लाइव्ह गाणी सादर केली जातात. नवरात्रीचे नऊ  दिवस जोशात रात्री, मध्यरात्रीपर्यंत खेळला जाणार गरबा नक्कीच ऊर्जेचं, उत्साहाचं आणि नवचैतन्याचं प्रतीक आहे. तरुणाईचा तर हा ‘फेवरेट’ सण आहे, जिथे बरेचदा तरुण-तरुणी प्रेमात पडतात, जोडय़ा जमतात. (हादेखील गरब्याच्या परंपरेचा भाग आहे.) असे बघायला मिळते.

<