धक्कादायक: टकलाच्या पासपोर्टचं यूपीए सरकारकडून नूतनीकरण

faruq takala dawood

टीम महाराष्ट्र देशा- फारुख टकलाच्या पासपोर्टचं यूपीएच्या काळात 2011 मध्ये नूतनीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा एकेकाळचा साथीदार फारुख टकलाकडे यूपीए सरकारने दुर्लक्ष केलं की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे.  ज्यावेळी पासपोर्टचं  2011 मध्ये नूतनीकरण करण्यातत्यावेळी एस एम कृष्णा परराष्ट्र मंत्री होते, तर पी चिदंबरम देशाचे गृहमंत्री होते.टकलाविरोधात 1995 साली इंटरपोलनं रेडकॉर्नर नोटीस बजावली होती, त्यानतंर 2011 साली टकल्याच्या पासपोर्टची मुदत संपली. टकलानं दुबईतून पासपोर्ट नूतनीकरणासाठी त्यानं 7 फेब्रुवारी 2011 ला अर्ज केला आणि विशेष म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या पोसपोर्टचं नूतनीकरण करण्यात आलं.