कलम 370 हटवणे अशक्य असल्याचे फारूक अब्दुल्ला यांचे मत

नांदेड : काश्मीरबाबतचे कलम 370 हटवणे अशक्य असल्याचे मत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी नांदेड येथे व्यक्त केले. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी ते आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी मनमोकळया गप्पा मारल्या.

मुस्लीम समाजाने पाल्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे तरच त्यांना प्रगती करून देशात अस्तित्व टिकवता येईल. तसेच चीनबाबत जो न्याय भारताने लावला तोच न्याय पाकिस्तानबाबत लावावा आणि पाकिस्तानबरोबर चर्चा करावी असे ते म्हणाले.

काश्मीरला अधिकाधिक पर्यटकांनी भेट दयावी पर्यटन व्यवसाय वाढावा. मी नांदेडमध्ये गुरू दर्शनासाठी, आर्शिवाद घेण्यासाठी आलो आहे असे ते म्हणाले. देशात गुंडगिरी वाढली असून गौरी लंकेश यांची हत्त्या याचे उदाहरण आहे असे ते म्हणाले. आधीचे प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेक तज्ञांशी कलम 370 बाबत चर्चा केली, या बाबत एक समितीही नेमली होती. पण समितीने कलम 370 हटवता येणार नसल्याचे म्हटले असल्याचे त्यांनी स्ष्ट केले. चीनशी चर्चा करून डोकलाम समस्येवर तोडगा निघू शकतो, तर तोच न्याय पाकिस्तानबाबत लावून भारताने चर्चा करावी असे ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...