अयोध्येत राममंदिराची वीट रचायला तयार – फारुख अब्दुला

टीम महाराष्ट्र देशा : अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र या प्रकरणी नव्या पीठाचे गठन होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. १० जानेवारी रोजी नव्या पीठाचे गठन होणार असून त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांनी राम मंदिराबाबत भाष्य केले.राममंदिराचा मुद्दा सामोपचाराने मिटवायला हवा, प्रभू राम हे फक्त हिंदूचे नाहीतर संपूर्ण जगाचे देव होते त्यामुळे सामंंज्यसाने हा मुद्दा सोडवला तर मंदिराची वीट रचण्यासाठी मी तयार आहे.

राम मंदिराच्या मुद्यावरून फारुक अब्दुल्ला पत्रकारांशी बोलत आहे.राम मंदिराचा प्रश्न सोडवण्यासाठी कोर्टात जाण्याची नाही,हा प्रश्न चर्चा करून सोडवला जावू शकतो,असा मला विश्वास आहे. प्रभू रामचंद्र हे केवळ हिंदूचे नव्हे तर संपूर्ण जगाचे आहेत. राम मंदिर बनवण्यासाठी भाजपचे काहीही योगदान नाही. भाजप केवळ खुर्चीवर बसून राहण्यासाठी राम मंदिराची चर्चा करतेय. भाजपने गेल्या साडेचार वर्षात काहीही केलेले नाही, असा आरोपही फारूख अब्दुल्ला यांनी केला.