चीन, पाकिस्तानपेक्षा भारतातील काही लोकांकडूनच देशाला धोका – फारुख अब्दुल्ला

नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानपासून देशाला काहीच धोका नाही. देशाला काही अंतर्गत शक्तींकडूनच धोका आहे, असे प्रतिपादन आज नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी आज येथे केले. संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग उपस्थित होते. ते म्हणाले की, चीन आणि पाकिस्तानचा सामना करण्याची ताकद भारताकडे आहे. दुर्देव हे आहे की, भारतात काही असे लोक आहेत जे भारतात राहूनच भारताचे नुकसान करत आहेत. मी मुसलमान आहे, यात कोणतीच शंका नसून मी एक हिंदुस्तानी मुसलमान असल्याचा मला अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.