शेतकरी, युवकांची निराशा करणारा अर्थसंकल्प- धनंजय मुंडे

मुंबई : मागील चार वर्ष संकटात असलेल्या शेतकऱ्यांची निराशा आणि युवकांचा भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणूकीत राज्यातील जनतेने भाजपाला भरभरुन मतदान करुनही त्यांची झोळी मात्र रिकामीच ठेवण्याचे काम राज्याच्या भाजपा सरकारने ठेवले असल्याचे ते म्हणाले.

Loading...

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची, ठोस आर्थिक मदतीची अत्यंत निकड असतांना सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्याला बगल देण्यासाठी काहीशे कोटींची तरतूद करुन मुळ प्रश्नावरुन लक्ष विचलीत करण्याचा सरकारने प्रयत्न केला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. कालच्या आर्थिक पाहणी अहवालातूनच सरकारच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. आजचा अर्थसंकल्प हा कोणतेही नावीन्य नसलेला, जुन्याच योजनांची उजळणी करणारा आहे. पीक वीमा योजनेत २२०० कोटी रुपये भरपाई दिल्याचे सांगणारे अर्थमंत्री विमा कंपन्यांनी ३३०० कोटी रुपयांचा नफा लुटुन नेल्याचे मात्र लपवून ठेवत आहेत.

शेतकरी, बेरोजगारांप्रमाणेच कोतवाल, आशावर्कर, अंगणवाडी सेवीका, पोलीस पाटील, संगणक परिचालक, अशा विविध मानसेवी कर्मचाऱ्यांना मानधनवाढी संदर्भात या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र या सर्वांना उपेक्षित ठेवण्याचे काम सरकारने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा साधा उल्लेखही या अर्थसंकल्पात केला नसल्याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले असून एकंदरच सर्वच घटकांची निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली