करमाळा : मशागतीसाठी पैसे नसल्याने साठवून ठेवलेला माल बाजारात विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

करमाळा- करमाळा तालुक्यातील जेऊर परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातील शेती मशागतीच्या कामाला प्रारंभ केला आहे.
मात्र अनेक शेतकऱ्यांकडे बैल बारदाणा नसल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर यंत्राद्वारे शेती मशागत करावी लागत आहे.

परिसरातील पिके काढून रिकामी झालेल्या जमिनीची नांगरणी सह मशागतीचे कामे शेतकरी ट्रॅक्टर यंत्राद्वारे करून घेत आहेत. मात्र, इंधन दरवाढीची कारणे देत ट्रॅक्टर मालकांनी दरवाढ सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

शेतकरी सध्या काहीच कामे नसल्यामुळे शेतीच्या मशागती मध्ये गुंतला आहे शेताची नांगरणी केल्यास जमीन आणि चांगली तापून नक्षत्रात पडलेला पाऊस नांगरटी केलेल्या जमिनी मध्ये मिळतो त्यामुळे पिके जोमदार येतात अशी भावना या परिसरातील शेतकऱ्यांची आहे.

एक एकर क्षेत्र मशागतीसाठी गेल्या वर्षी तेराशे ते पंधराशे रुपये असलेला भाव यावर्षी सोहळाशे ते आठराशे रुपये पर्यंत पोहोचला आहे.
दुष्काळी परिस्थितीमध्ये हाताला काम नसल्याने शेतकरी चांगला पाऊस पडेल या आशेवर साठवून ठेवलेला माल बाजारात मिळेल त्या भावात विकून शेतातील मशागतीचे काम उरकून घेत आहे त्यातच रासायनिक खताचे भाव दोनशे ते आडीशे रुपये पर्यंत वाढल्याने शेतकरी दुष्काळात आर्थिक संकटात सापडला आहे.

जेऊर परिसरातील कोंढेज, वरकटणे,साडे, सालसे, फिसरे,आवाटी,निंभोरे,मलवडी,भाळवणी,शेलगावं(वि) आदी गावातील अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे बैल बारदाना मोडीत काढला असून सद्या ट्रॅक्टर यंत्राद्वारे शेत जमिनीची नांगरट मशागत करण्याशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय नाही त्यामुळे दररोज ट्रॅक्टर मालकाकडे चकरा मारीत आहेत.

धान्य विकून शेतीची मशागत

गेल्या वर्षी पाऊस काळ न झाल्याने उत्पन्नात मोठी घट झाली त्यामुळे कुटुंबाची आर्थिक नियोजन कोलमडले असून थोडेफार धान्य ठेवलेले विकून शेतीची मशागत करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिलेला दिसून येत आहे.

 Loading…
Loading...