बैलगाडा शर्यतीची कैफियत मांडणार ‘राज’दरबारी, शेतकरी घेणार राज ठाकरेंची भेट

raj thackeray

ठाणे : बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा आहे. सरकार आणि न्यायालयाने या गोष्टींचा विचार करावा. बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. दक्षिण भारतात वेगळा न्याय आणि महाराष्ट्राबाबत का दुजाभाव असा या शेतकऱ्यांचा तसेच बैलगाडामालकांचा सवाल आहे. या शर्यतीला परवानगीसाठी शेतकरी आता थेट रस्त्यावर उतरले.

आता ठाणे जिल्ह्यातील शेतकरी हे सुद्धा आक्रमक झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शेतकरी आणि बैलगाडा चालकांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली आहे. बैलगाडा शर्यत पुन्हा सूरु करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती यावेळी त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी याबाबतचे पत्र सुद्धा मनसे आमदार राजू पाटील यांना दिले आहे.

तर मनसे आमदार राजू पाटील यांनी शेतकऱ्यांचे आणि बैलगाडा चालकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि याबाबत मी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याशी बोलतो आणि आपण त्यांना भेटायला सुद्धा जाऊ असे सांगितले आहे. यावेळी संदीप माळी, सचिन सरनोबत, विलास पाटील, सुनील मुंडे आणि शेतकरी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या