शेतक-यांना कृषिपंप वीजबिल दुरुस्तीची संधी

सोलापूर : वीजबिलाच्या तक्रारी असल्यास कृषिपंप वीज ग्राहकांसाठी सोलापूर जिल्ह्यात २ ते २० जानेवारीदरम्यान फीडरनिहाय वीजबिल दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. महावितरणच्या वतीने कृषिपंप ग्राहकांना तत्काळ वीजबिल दुरुस्त करून देण्यासाठी या महिन्यात फीडरनिहाय वीजबिल दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्यात आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या विविध शाखा कार्यालयांत आणि उपकेंद्रांत २ ते २० जानेवारीदरम्यान वेगवेगळ्या दिवशी ही शिबिरे होणार आहेत. ज्या कृषिपंप ग्राहकांना वीजबिलाबाबत तक्रारी असतील त्यांनी शेवटचे वीजबिल भरल्याची पावती सोबत घेऊन या शिबिरांना हजर रहावयाचे आहे. सर्व बिले तपासून जागेवरच सुधारित बिल देण्यात येणार आहे.

शिबिरांच्या अधिक माहितीसाठी ग्राहकांनी महावितरणचे संबंधित शाखा किंवा उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतक-यांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या वीजबिलाची दुरुस्ती करून घ्यावी आणि वीजबिलाचा तत्काळ भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.