बांधकाम साहित्यासाठी पोलिसांची शेतकऱ्यांना समज

औरंगाबाद : पोलीस ठाणे पिशोर हद्दीत कंपनी कल्याण टोल इंफ्राचे रोडवर पूल बांधण्याचे काम मौजे हस्ता येथे चालू होते. काम पूर्ण झाल्यावर आजूबाजूला बरेच दिवसापासून लोखंडी पोल, लोखंडी सळई ,लोखंडी जॅक व लोखंडी प्लेट असे एकूण 150000/- रू.साहित्य पडलेले होते. सदरचे साहित्य चोरी गेल्या ची माहिती संबधीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कळवले होते. हे साहित्य तेथील शेतकऱ्यांनी वापरास घेतल्याची माहिती मिळताच त्यांना समज देण्यात आली.

हस्ता येथे तात्काळ घटनास्थळावर जाऊन आजूबाजूचे 10 ते 15 शेतकऱ्यांना पोलिसांनी विचारपूस केली असता, त्यांनी ते साहित्य बेवारस पडलेले असल्याने त्यांनीच स्वतःचे उपयोगात घेतले असल्याचे सांगितले. नंतर ते साहित्य स्वतःहून परतही केले. हा संपूर्ण मुद्देमाल संबधित कंपनीला परत करण्यात आला.

शेतकऱ्यांनी गैरसमजुतीने त्याचे बांधकामाचे साहित्य नेल्या मुले व स्वतःहून परत केल्यामुळे सदरच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार केली नाही व पोलिसांनी तात्काळ शोध घेतल्यामुळे धन्यवाद मानले. तसेच शेतकऱ्यांनी बेवारस साहित्याला हात लावू नये व आपल्या उपयोगात घेऊ नये अशी समज पोलिसांनी कडून देण्यात आली. हे साहित्य पोना/35 दराडे, पोना/६७८ कनकुटे, पोशि/१२३ राजपूत यांनी शोधून संबंधितांना परत केले.

महत्त्वाच्या बातम्या :