संतप्त शेतकऱ्याचा तूर खरेदी केंद्रावरच तूर पेटवण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : औरंगाबादमधील तूर खरेदी केंद्रावर तूर गुणवत्ता निकषांवरुन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. याच रोशातून आज शेतकऱ्यांनी तूर जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

चांगल्या प्रतीची तूर खरेदी करण्यास खरेदी केंद्र नकार देत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्ठाने पिकवलेली तूर जाळण्याचा प्रयत्न केला.

आपल्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या तुरीला अशाप्रकारे आग लावताना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड राग आहे. परंतु विभागवार तूरीची ओळख करण्यासाठी सुतळीच्या रंगाचा आधार घेतला जात असल्यानं तूर खरेदीला आधीच उशीर होत आहे. त्यात अशाप्रकारे होत असलेल्या अडवणुकीला विरोध म्हणून शेतकऱ्याने हे टोकाचे पाउल उचलले आहे.

You might also like
Comments
Loading...