बँकेला गंडा घालून पळालेल्या नीरव मोदीच्या जमिनीचा शेतकऱ्यांनी घेतला कब्जा

farmers-take-charge-of-nirav-modis-land-in-ahmednagar-district-karjat

अहमदनगर: पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींना गंडा घालून परदेशात पळालेल्या नीरव मोदीच्या शेतीवर शेतकऱ्यांनी कब्जा केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातीळ कर्जत येथे नीरव मोदीची तब्बल २२५ एकर जामीन आहे. यावेळी शेतकऱ्यांनी हातात तिरंगा झेंडा घेवून नीरव मोदीच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Loading...

पंजाब नॅशनल बँकेला हजोर कोटींना चुना लावून हिरे व्यापारी असणारा नीरव मोदी सध्या परदेशात पळून गेला आहे. त्यामुळे मोदीला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘आई मुक्ती संग्राम’ नावाचे आंदोलन छेडले आहे. स्थानिक शेतकरी केवळ शेतीवर कब्जाकरून थांबले नाहीत तर त्यांनी ट्रॅक्टर आणि बैलांच्या मदतीने शेती नांगरून घेतली. तसेच उद्यापासून ती कसण्याचा मानस व्यक्त केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी कब्जा केलेली जामीन आधीच अंमलबजावणी संचालनालय (इडीने) जप्त केली आहे.

कोण आहे नीरव मोदी
नीरव मोदी हा मुळचा बेल्जियमचा राहणारा हिरे व्यापारी. १९९९ मध्ये त्याने आपल्या कंपनीची सुरुवात केली. फोर्ब्स मासिकानुसार मोदी याची आजची सं पत्ती ११ हजार कोटींच्या आसपास आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्याचा ८४ व क्रमांक लागतो. त्यांचे ज्वेलरी शोरूम लंडन, न्यूयॉर्क, लास वेगास, हवाई, सिंगापुर, बीजिंग सारख्या 16 शहरांमध्ये आहेत. भारतामध्ये दिल्ली आणि मुंबईत त्याचे बुटिक आहेत.

कसा झाला घोटाळा ?
देशविदेशात व्यापार असणाऱ्या नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँक मुंबई शाखेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याची कंपनी असणाऱ्या आर यूएस, सोलर एक्सपोर्ट्स आणि स्टेलर डायमंड्सच्या खरेदी विक्रीसाठी LOU मिळवला. LOU (लेटर ऑफ अंडरटेकिंग) म्हणजे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला देण्यात येणारी टाईम गॅरंटी. म्हणजेच एखद्या बँकेने कोणत्याही व्यक्तीला अशी गॅरंटी दिली असेल आणि त्याच्या विश्वासावर दुसऱ्या बँकांनी कर्ज दिल्यास ते संबंधित व्यक्तीने परतफेड न केल्यास गॅरंटी देणाऱ्या बँकेला ते भरावे लागते. याच गॅरंटीच्या भरवशावर भारतीय बँकाच्या विदेशी शाखा असणाऱ्या AXIS बँक, इलाहाबाद बँक आणि युनियन बँक यांनी नीरव मोदीला क्रेडीट लोन दिले. हा घोटाळा समोर आल्यानंतर आता सरकारकडून सर्व बँकांना त्यांचे बॅलन्सशीट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.Loading…


Loading…

Loading...