मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार नवनवीन योजना व सुविधा पुरवते. फक्त उत्पन्न वाढावे म्हणून नव्हे तर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा कसा मिळेल याचाही सरकार विचार करून योजना राबवत असतं.
स्माम या योजनेतून सरकारकडून शेतकऱ्यांना शेती उपकरणे घेण्यास अनुदान दिले जाते. माहितीनुसार या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना ५० ते ८० टक्के पर्यंतचे अनुदान देते. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ सातबारा नावावर असणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती उपकरणे अगदी सहज अनुदानामध्ये मिळू शकणार शकतात. नवीन उपकरणे घेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही या पाश्वर्भूमीवर ही योजना केंद्राने शेतकऱ्यांसाठी आणली आहे.
या योजनेचा लाभ असा घ्या –
- स्माम या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम https://agrimachinery.nic.in/ या संकेतस्थळावर लॉगिन करा.
- याठिकाणी Registration असा पर्याय समोर येईल. तेव्हा त्यामध्ये शेतकरी (Farmer) हा पर्याय निवडा. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज समोर येईल.
- या पेजवर नोंदणी करा.
- यामध्ये तुमते नाव, आधार कार्ड क्रमांक टाका.
- त्यानंतर अर्जातील संपूर्ण माहिती भरा.
- पढे Submit यावर क्लिक केल्यावर नोंदणी प्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली असेल.
महत्वाच्या बातम्या –