fbpx

‘धनदांडग्यासाठी’ सुकाणूचा अट्टहास – पांडुरंग फुंडकर

Pandurang Fundkar target farmers sukanu samiti

बुलडाणा – राज्य सरकारने शेतकऱ्यांची सरसकट दीड लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र संपूर्णपणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी सुकाणू समितीकडून करण्यात येत आहे. याच मागणीवरून सुकाणू समितीवर राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून टीका करण्यात येत आहे.

राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा फायदा 89 लाख शेतकऱ्यांना होणार असून 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. मात्र गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारी सुकाणू समिती आता धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळावा म्हणून आंदोलनाची भाषा करत असल्याचा आरोप कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बुलडाण्यात पत्रकारांशी बोलताना केला आहे.