fbpx

उस्मानाबादमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये ओमराजे आणि उद्धव ठाकरेंची नावे

टीम महाराष्ट्र देशा : उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे गावात एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. दिलीप ढवळे असं या शेतकऱ्याचं नाव असून, आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबाळकर आणि उद्धव ठाकरे यांची नावे आहेत.

दिलीप ढवळे यांच्या खिशात दोन सुसाईड नोट सापडल्या. त्यातील एका चिठ्ठीत म्हटलंय की, “आत्महत्येला ओमराजे निंबाळकर आणि वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक जबाबदार आहेत.” तसेच दुसऱ्या चिट्टीत, “१३ शेतकऱ्यांनी तेरणा कारखान्याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र भेट झाली नाही.” असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेचे उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवार ओमराजे निंबाळकरांना मतदान करु नका, असे आवाहनही या सुसाईड नोटमधून केले आहे.

या प्रकरणी ढोकी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शेतकरी ढवळे यांचा मुलगा निखिल आणि भाऊ राज ढवळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.