शेतकऱ्यांचा मृत्यू किटकनाशकांमुळे नाही तर अती दारु पिल्याने; राजू श्रॉफ

kitaknashak

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये कीटकनाशक फवारणीवेळी विषबाधा झाल्याने अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र शेतकऱ्याचा मृत्यू विष पिल्यामुळे किंवा अती दारु पिल्यामुळे झाली आहेत किटकनाशकांच्या विषबाधेमुळे नाही, अस चीड आणणार विधान किटकनाशक निर्मात्यांची संघटना क्राँप फेडरेशन आँफ इंडियाचे अध्यक्ष राजु श्राफ यांनी केलं आहे. न्यूज – १८ लोकमत वाहिनीने याबबतच वृत्त दिले आहे. तसेच विषबाधेतून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा पुरावा कोणी दिल्यास 50 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली.