प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सभागासाठी  शेकऱ्यांनाचा संघर्ष 

प्रतिनिधी/ नांदेड (ज्ञानेश्वर राजुरे) :अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे संरक्षण मिळावे, यासाठी सर्वच शेतकऱ्यांनि शेतातील पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मोठा संघर्ष करवा लागतोय , यासाठी शासनाने राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं मात्र आता या योजनेची विदारक स्थिती पाहायला मिळतीय, पीक विमा भरण्याची अंतिम तारीख जवळ(31 जुलै) येतीय त्यामुळे शेतकऱ्यांची बँकेत गर्दी वाढतीय, तर या योजनेत सहभागासाठी ऑनलाई पद्धतीने फॉर्म / पैसे भरण्यात येतात. संबंधी योजनेसाठी कामकाज अतिशय धीम्या गतीने होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय, आपल्या विविध मागण्यासाठी मुखेड(तालुक्यात) शहरात शेतकरी रस्त्यावर उतरले. काही काळ शेतकऱयांनी चक्क जाम आंदोलन करत सरकार चा निषेध केला. तात्काळ पीक विम्याचे पैसे भरण्याची सुविधा शासनाने उपलब्द करून द्यावी तसेच शेतकऱ्यांना येणार्यांना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात अशा विविध मागण्यासाठी अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले…


गेल्या वर्षी बँकांकडून शेकऱ्यांचे अगोदर फॉर्म आणि पैसे घेऊन नंतर ऑनलाईन पद्धतीने कामे केली जात असत आता सरसकट इकाच वेळी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आणि पैसे या योजनेसाठी घेतली जातायत सिस्टम बंद होणे , सर्वर डाऊन होणे या शासनाच्या कामकाजाच्या कचाट्यात सामान्य शेतकरी भरडला जात असून बँके व्यतिरिक्त खासजी एजेंट (इंटरनेट धारक) कडून या योजनेसाठी शेकऱ्यांचे अवाच्या सव्वा पैसे उकळण्याचं काम केलं जातंय या शासनाच्या कामकाजाच्या पद्धतीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांना च्या अडचणीत आणखी भर पडताना दितीय, या विषयी संतप्त शेतकऱ्यांनी मुखेड शहरात नांदेड – मुखेड रोड वरील वाहतूक काहीकाळ रोखून धरली , शिवकुमार पाटील येवतीकर , दत्ता नागरगोजे , दिगंबर उलगुलवड (नारणाळीकर) शिवाजी गोपणार ,सूर्यकांत आडे या शेकऱ्यांना या आंदोलनाचं नेतृत्व केलं , या आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.