शेतकऱ्यांनी वडेट्टीवारांची गाडी अडवली… संभाजीराजे म्हणाले, तो तर शेतकऱ्यांचा अधिकार

sammbhajiraje bhosale

नांदेड : लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात परतीच्या पावसानं प्रचंड हाहाकार उडवला. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं. अनेक शेतमाल पुरात वाहून गेला, तर शेतात उभी असलेली पिकं सडून गेली. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेतेमंडळी दौरे करत आहेत.

दरम्यान, परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आता सरकारमधील मंत्री मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पोहोचत आहेत. मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार आज नांदेड दौऱ्यावर आहेत. मात्र, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना विजय वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.

पाहणी दौरे बंद करून तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मुखेड तालुक्यातील सलगरा इथं ही घटना घडली. यावेळी मंत्र्यांना निवेदनाद्वारे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शासनाप्रती बळीराजाच्या मनात असणारा रोष किती तीव्र आहे याचा प्रत्यय आल्याची चर्चा आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे समर्थन खा. संभाजीराजे भोसले यांनी केले. शेतकऱ्यांनी मंत्र्यांची गाडी अडवली असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, असं ते म्हणाले.संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, कालपासून मी पंढरपुरातून दौरा सुरू केला आहे. आज मराठवाड्यात काही भागांना भेट देतोय. शेतकऱ्यांना मदत करणे खूप गरजेचे आहे. 50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली, तेच माझं देखील आहे.

मान्य आहे सरकार आर्थिक संकटात आहे, सगळं बरोबर असलं तरी आता बळीराजाला मदत द्यावीच लागेल. केंद्र सरकार असो वा राज्य सरकार दोन्ही सरकारने मिळून शेतकऱ्यांना उभारी दिली पाहिजे. तात्काळ मदत जाहीर करा म्हणून शेतकऱ्यांनी मंत्र्यांची गाडी अडवली असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-