लातूर : जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेतलेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी आपला कापूस शासकीय कापूस खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी नोंदणीसाठी दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा उपनिबंधक समूर्त जाधव यांनी केले आहे.
शासकीय कापूस खरेदी नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकला टच करून आपली माहिती भरावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdurgbXVOdg4yGLQC8EyiCiP1ez7DfDdsTviHDLqC2Lblgyhw/viewform?usp=sf_link
तसेच ही माहिती भरताना आपल्याकडे असलेल्या कापसाचा आपल्या सोबतचा सेल्फी फोटो नोट कॅम ॲपद्वारे काढावा व माहिती भरताना फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपली नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही. तरी शासकीय कापूस खरेदीसाठी वरील प्रमाणे नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासन व सीसीआय, कॉटन फेडरेशन यांच्यामार्फत मार्फत करण्यात येत आहे.