‘शेतकऱ्यांनी वरुण गांधींचे अभिनंदन करायला हवे’, संजय राऊतांनी केले कौतूक

‘शेतकऱ्यांनी वरुण गांधींचे अभिनंदन करायला हवे’, संजय राऊतांनी केले कौतूक

मुंबई : उत्तर प्रदेशातील पीलीभीतचे लोकसभेतील भाजपचे खासदार वरुण गांधी लखीमपूर खिरी प्रकरणावरून आपल्या पक्षाला घरचा अहेर दिला आहे. लखीमपूर खिरी हिंसाचारावरून हिंदू आणि शिखांना आपसात लढवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं वरुण गांधी म्हणाले. दरम्यान, या मुद्द्यावरून शिवेसनेने वरुण गांधी यांचे आजच्या सामना अग्रलेखातून कौतूक केले आहे. ‘शेतकऱ्यांनी वरुण गांधींचे अभिनंदन करायला हवे. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वच शेतकरी संघटनांनी केला पाहिजे’ असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की, ‘भारतीय जनता पक्षाच्या खासदार वरुण गांधींनी घटनेचा निषेध केला. तेव्हा वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी या दोघांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आलं. वरुण गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वच शेतकरी संघटनांनी केला पाहिजे. एक मर्द निपजला व त्याने शेतकऱ्यांच्या अन्यायाचा निषेध केला आणि त्याची राजकीय किंमत चुकवावी लागली तरी पर्वा केली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बाजू उघडपणे घेतली. शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली, यात त्यांचे काय चुकले? वरुण गांधी हे धाडसाने बोलले. इतरांची मने या प्रश्नी निदान आतल्या आत खदखदत असतील,’असे मत सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आलंय.

काय म्हणाले होते वरुण गांधी?
वरुण गांधी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. लखीमपूर खिरी हिंसाचारावरून हिंदू आणि शिखांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे फक्त अनैतिक आणि चुकीचेच नाही, तर दोष देणे आणि त्या जखमा पुन्हा चिघळवणं धोकादायक आहे. एका छोट्या राजकीय फायद्यासाठी देशाची एकता धाब्यावर ठेवू शकत नाही, असं म्हणत वरुण गांधींनी भाजप नेतृत्वार निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या