शेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचा, पिक विमा कंपनीकडून अद्यापही स्वीकारला जात नाही. तो तात्काळ भरून घेण्यास सुरुवात करावी, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळसदृष्य स्थितीत आहेत. अगोदर कोरडा दुष्काळ आणि नंतर अवकाळी पावसाने पुन्हा पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना रब्बीचा पीकविमा भरण्याची सुविधा अद्यापही बीड जिल्ह्यात उपलब्ध झाली नाही. तसेच रखडलेला पीक विमा, नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना अदा करावी, या इतर मागण्याही नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.

दुष्काळ आणि अतिवृष्टीमूळे बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार मुंदडा यांनी पाहणी केली होती. मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. या विषयी तहसिलदार आणि शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही आमदार नमिता मुंदडा यांनी शेतकऱ्यांना दिले होते. शेतकऱ्यांना मदत मिळावीत यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. याच माध्यामतून पीक विमा विषयी सरकारकडे शेतकऱ्यांची मागणी पोहचवली आहे.

महत्वाच्या बातम्या